Surprise Me!

Mandwa बंदरात ferry service Boat बुडाली | सुदैवानं सर्व प्रवासी सुखरुप | Alibaug | Maharashtra News.

2021-09-13 36 Dailymotion

अलिबाग : मांडवा बंदरात आज सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास अजंठा पॅसेंजर बोट बुडाली. बोटीमध्ये 88 प्रवासी प्रवास करत होते. पोलिसांच्या पेट्रोलिंग करणाऱ्या बोटीने 80 जणांना वाचवले. अन्य 8 जणांना खासगी बोटीने वाचवण्यात यश आले आहे.गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथून सकाळी 9 वाजता अल फथेह बोट सुटली होती. मांडावा बंदरा जवळ 200 मीटर अंतरावर असताना बोट बुडू लागली. बोटीला खाली दगड लागला असण्याची शक्यता आहे.
प्रवाशी घाबरले त्यावेळी पोलिसांची सद्गुरू कृपा या पेट्रोलिंग करणाऱ्या बोटी ने तातडीने मदत केली आणि बोटीतील 80 जणांना वाचवले अन्य 8 प्रवाशांना खासगी बोटीने सुखरूप मांडावा बंदरावर उतरवले.
मांडवा पो.स्टे. हद्दीत आज दि.14/03/2020 रोजी सकाळी 10:15 वाजेच्या सुमारास गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जेट्टी या दरम्यान चालणारी अजिंठा प्रवासी बोट 88 प्रवाशी घेऊन मांडवा जेट्टीपासून 1 किलोमीटर अंतरावर असताना अचानक बुडू लागल्याने बोटीवरील प्रवास करणारे पुरुष, महिला व लहान मुले यांनी घाबरून आरडाओरड चालू केला असता सागरी गस्तीवर निघालेल्या रायगड जिल्हा पोलीस दलातील सद्गुरू कृपा बोटी वरील नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी पो. ना बक्कल न. 891 श्री प्रशांत घरत यांनी ट्रॉलर वरील तांडेल व खलाशी यांचे मदतीने बुडणाऱ्या प्रवाशी बोटींजवळ त्वरित पोहचून स्वतः च्या जीवाची पर्वा न करता अत्यन्त सावधगिरीने त्यावरील 88 पुरुष, महिला व बालके यांचा जीव वाचवून त्यांना पोलीस गस्तीवरील नौकेच्या सहाय्याने जेट्टीवर सुखरूप आणले..
#LokmatNews #mandva #alibag #boat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरं

Buy Now on CodeCanyon